प्रस्तावना – मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना– भारत हा संत, धर्मगुरू आणि भक्ती परंपरेचा देश आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. येथे वारकरी संप्रदाय, भक्तीमार्ग आणि अध्यात्मिक परंपरा शेकडो वर्षांपासून चालत आलेली आहे. प्रत्येक जेष्ठ नागरिकाच्या मनात एकदा तरी चारधाम यात्रा, अमरनाथ यात्रा, वैष्णोदेवी यात्रा किंवा इतर तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची सुप्त इच्छा असते. परंतु आर्थिक परिस्थिती, आरोग्य समस्या आणि सोबत कोणी नसल्याने अनेक जेष्ठ नागरिकांचे हे स्वप्न अपूर्ण राहते.भारत हा विविध धर्म, संस्कृती आणि परंपरांचा संगम असलेला देश आहे. देशात हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, जैन, बौद्ध अशा अनेक धर्मांचे अनुयायी एकत्र राहतात. महाराष्ट्र राज्याला संतांची भूमी म्हणून विशेष ओळख आहे. येथे अनेक महान संत, समाजसुधारक आणि धर्मगुरूंनी आपले कार्य केले आहे. त्यांच्या विचारांचा प्रसार केवळ भारतातच नव्हे तर जगभर झाला आहे.
महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाची शेकडो वर्षांची परंपरा आहे. लाखो वारकरी दरवर्षी पंढरपूरच्या वारीला जातात आणि विठ्ठल भक्तीचा संदेश देतात. समाजात धार्मिक श्रद्धा आणि आध्यात्मिकता मोठ्या प्रमाणावर आढळते. अनेक ज्येष्ठ नागरिकांना आयुष्यात एकदा तरी देशातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची इच्छा असते.
परंतु आर्थिक अडचणी, शारीरिक मर्यादा किंवा सोबत कोणी नसल्यामुळे अनेक ज्येष्ठ नागरिकांना तीर्थयात्रा करण्याचे स्वप्न पूर्ण करता येत नाही.
हीच बाब लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने “मुख्यमंत्रि तीर्थदर्शन योजना” सुरू केली आहे. या योजनेत राज्यातील सर्व धर्मातील ६० वर्षे व त्यावरील जेष्ठ नागरिकांना भारतातील प्रमुख तीर्थक्षेत्रांना मोफत भेटीची/दर्शनाची संधी दिली जाते.
योजनेचे उद्दिष्ट
या योजनेची मुख्य उद्दिष्टे पुढीलप्रमाणे आहेत:
- राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना धार्मिक तीर्थस्थळांना भेट देण्याची संधी देणे
- ज्येष्ठ नागरिकांचे आध्यात्मिक आणि मानसिक समाधान वाढवणे
- आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांना मोफत तीर्थयात्रेची सुविधा उपलब्ध करून देणे
- सामाजिक समरसता आणि धार्मिक सौहार्द वाढवणे
- ज्येष्ठ नागरिकांना आनंददायी आणि सुरक्षित प्रवास अनुभव
योजनेची व्याप्ती
- महाराष्ट्र व भारतातील प्रमुख तीर्थक्षेत्रांचा समावेश.
- यात्रेकरूंना रेल्वे किंवा बसने प्रवासाची सोय.
- भोजन, निवास, सुरक्षेची व्यवस्था शासनाकडून.
- प्रवास खर्चाची कमाल मर्यादा रु. ३०,०००/- प्रति व्यक्ती.
- प्रत्येक लाभार्थ्याला या योजनेचा एकदाच लाभ घेता येईल.
या योजनेमध्ये महाराष्ट्र तसेच भारतातील प्रमुख तीर्थक्षेत्रांचा समावेश करण्यात आला आहे.
उदाहरणार्थ:
- काशी
- रामेश्वरम
- बद्रीनाथ
- केदारनाथ
- वैष्णोदेवी
- तिरुपती बालाजी
- अमरनाथ
- जगन्नाथ पुरी
- द्वारका
- पंढरपूर
- शिर्डी
शासन वेळोवेळी या यादीमध्ये बदल करू शकते.
पात्रता निकष
- लाभार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
- वय ६० वर्षे किंवा त्याहून अधिक असावे.
- वार्षिक कौटुंबिक उत्पन्न रु. २.५० लाखांपर्यंत असावे.
- शारीरिक व मानसिकदृष्ट्या प्रवासासाठी सक्षम असणे आवश्यक.
- सरकारी वैद्यकीय अधिकाऱ्याचे आरोग्य प्रमाणपत्र आवश्यक.
अपात्रता निकष
- आयकरदाता असलेले कुटुंब.
- कायम सरकारी कर्मचारी किंवा निवृत्तीनंतर पेन्शनधारक.
- खासदार/आमदार असलेले कुटुंब सदस्य.
- चारचाकी वाहन (ट्रॅक्टर वगळून) असलेले कुटुंब.
- गंभीर संसर्गजन्य रोग असलेले व्यक्ती.
- मागील वर्षी लॉटरीत निवड होऊनही प्रवास न केलेले अर्जदार.
आरोग्याशी संबंधित अटी
प्रवासासाठी अर्जदाराची आरोग्य तपासणी आवश्यक आहे.
खालील आजार असलेल्या व्यक्तींना प्रवास करता येणार नाही:
- टीबी
- गंभीर हृदयविकार
- श्वसनाचे गंभीर आजार
- मानसिक आजार
- संसर्गजन्य रोग
अर्ज करताना सरकारी वैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.

प्रवास खर्च मर्यादा
या योजनेअंतर्गत प्रत्येक लाभार्थ्यासाठी कमाल प्रवास खर्च मर्यादा ₹30,000 निश्चित करण्यात आली आहे.
या खर्चामध्ये खालील सुविधा समाविष्ट असतात:
- रेल्वे किंवा बस प्रवास
- निवास व्यवस्था
- भोजन व्यवस्था
- पर्यटन मार्गदर्शक
- इतर आवश्यक सुविधा
आवश्यक कागदपत्रे
- ऑफलाईन अर्ज.
- आधार कार्ड / रेशन कार्ड.
- महाराष्ट्र राज्याचे रहिवासी प्रमाणपत्र / जन्म दाखला.
- उत्पन्नाचा दाखला.
- वैद्यकीय प्रमाणपत्र.
- पासपोर्ट आकाराचा फोटो.
- नातेवाईकाचा मोबाईल क्रमांक.
- हमीपत्र.
अर्ज प्रक्रिया
- लाभार्थ्याने ऑनलाईन अर्ज करावा.
- जिल्हास्तरीय समितीद्वारे अर्जांची तपासणी केली जाते.
- लॉटरी पद्धतीने लाभार्थ्यांची निवड केली जाते.
- निवड झालेल्या लाभार्थ्यांची यादी समाजकल्याण विभाग व जिल्हा प्रशासनाकडे पाठवली जाते.
- अधिकृत टूर कंपनी/IRCTC द्वारे प्रवासाचे आयोजन केले जाते.
- लाभार्थ्यांना भोजन, निवास, सुरक्षा यांची संपूर्ण सोय केली जाते.
लाभार्थ्यांची निवड प्रक्रिया
अर्जदारांची संख्या जास्त असल्यास लॉटरी पद्धतीने निवड केली जाते.
निवड प्रक्रिया:
- जिल्हानिहाय कोटा निश्चित केला जातो
- संगणकीकृत लॉटरी काढली जाते
- प्रतीक्षा यादी तयार केली जाते
योजना अंमलबजावणी
- समाजकल्याण विभाग या योजनेची देखरेख करतो.
- जिल्हास्तरीय समिती लाभार्थ्यांची निवड करते.
- अधिकृत टूर कंपनी/IRCTC प्रवासाचे आयोजन करते.
- शासन प्रवासादरम्यान सुरक्षा व आरोग्य सुविधा उपलब्ध करून देते.
प्रवास व्यवस्था
प्रवासासाठी शासन अधिकृत पर्यटन कंपन्यांची नियुक्ती करते.
उदाहरणार्थ:
- रेल्वे प्रवासासाठी अधिकृत कंपन्या
- बस प्रवासासाठी पर्यटन एजन्सी
या एजन्सी खालील सुविधा उपलब्ध करून देतात:
- प्रवास व्यवस्था
- निवास व्यवस्था
- भोजन व्यवस्था
- मार्गदर्शक
प्रवासाचे नियम
प्रवासादरम्यान काही नियम पाळणे आवश्यक आहे.
- प्रवास गटाने करावा लागेल
- निवडलेल्या व्यक्तीशिवाय दुसऱ्या व्यक्तीस प्रवास करता येणार नाही
- प्रवासाच्या ठिकाणी स्वतःच्या खर्चाने पोहोचावे लागेल
- प्रवास अर्धवट सोडल्यास शासन जबाबदार राहणार नाही
योजनेचे फायदे
- गरीब व सर्वसामान्य जेष्ठ नागरिकांना तीर्थयात्रेची संधी.
- मानसिक शांती व अध्यात्मिक समाधान.
- धार्मिक सौहार्द व सामाजिक एकात्मता.
- शासनाचा आधार व सामाजिक सुरक्षा.
निष्कर्ष
महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना ही ज्येष्ठ नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त योजना आहे. या योजनेमुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या नागरिकांनाही देशातील प्रसिद्ध तीर्थस्थळांना भेट देण्याची संधी मिळते.
ज्येष्ठ नागरिकांचे आध्यात्मिक समाधान आणि आनंद वाढवण्यासाठी ही योजना महत्त्वाची भूमिका बजावत आहे. त्यामुळे पात्र नागरिकांनी या योजनेचा लाभ अवश्य घ्यावा.







Leave a Reply