प्रस्तावना – मुख्यमंत्री वयोश्री योजना
वय वाढतं तसं शरीर अशक्त होतं, डोळ्यांची व कानांची क्षमता कमी होते, चालण्यात अडचणी येतात. अशा वेळी जेष्ठ नागरिकांना आधार देणं ही शासनाची जबाबदारी आहे. मुख्यमंत्री वयोश्री योजना ही जेष्ठांना दैनंदिन जीवनात स्वावलंबी बनवण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. भारतामध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या झपाट्याने वाढत आहे. वयोमानानुसार अनेक ज्येष्ठ नागरिकांना शारीरिक अशक्तपणा, दृष्टीदोष, ऐकण्याची समस्या, चालण्यात अडचणी अशा विविध अडचणींना सामोरे जावे लागते. अनेक वेळा आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना आवश्यक वैद्यकीय उपकरणे किंवा सहाय्यक साधने खरेदी करणे शक्य होत नाही.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या Social Justice and Special Assistance Department Maharashtra मार्फत ज्येष्ठ नागरिकांसाठी एक महत्त्वाची योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेद्वारे 65 वर्षे व त्यावरील पात्र नागरिकांना ₹3000 एकरकमी आर्थिक सहाय्य दिले जाते.
ही रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यात DBT (Direct Benefit Transfer) पद्धतीने जमा केली जाते. या पैशातून ज्येष्ठ नागरिकांना चष्मा, श्रवणयंत्र, वॉकर, व्हीलचेअर यांसारखी आवश्यक उपकरणे खरेदी करता येतात तसेच मानसिक आरोग्य आणि योगोपचार केंद्रांमध्ये सहभागी होण्यासाठी मदत मिळते.
योजनेचे उद्दिष्ट
- जेष्ठ नागरिकांना सहाय्यभूत साधने उपलब्ध करून देणे.
- वयोमानानुसार येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करणे.
- मानसिक आरोग्य टिकवण्यासाठी योगोपचार केंद्रे, मनःशांती केंद्रे यामध्ये सहभाग वाढवणे.
- समाजात जेष्ठ नागरिकांचा आत्मविश्वास वाढवणे.
लाभाचे स्वरूप
- एकरकमी रु. ३०००/- थेट बँक खात्यात जमा (DBT प्रणाली).
- ही रक्कम सहाय्यभूत साधने खरेदीसाठी वापरता येईल.
- साधनांची यादी:
- चष्मा
- श्रवणयंत्र
- वॉकर / रायपॉड
- व्हीलचेअर
- कमोड खुर्ची
- बेल्ट, कॉलर इत्यादी
- मानसिक आरोग्यासाठी:
- योगोपचार केंद्रे
- मनःशांती केंद्रे
- प्रशिक्षण केंद्रे

मुख्यमंत्री वयोश्री योजना – पात्रता निकष
- लाभार्थ्याचे वय ६५ वर्षे पूर्ण असावे.
- आधार कार्ड / ओळखपत्र आवश्यक.
- वार्षिक कौटुंबिक उत्पन्न रु. २ लाखांपर्यंत असावे.
- मागील ३ वर्षांत शासनाकडून तेच साधन मोफत मिळालेले नसावे.
- लाभार्थ्याचे बँक खाते आधार संलग्न असावे.
- एकूण लाभार्थ्यांपैकी ३०% महिला असणे आवश्यक आहे.
आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड / मतदान कार्ड
- बँक पासबुक झेरॉक्स
- पासपोर्ट आकाराचे २ फोटो
- स्वयंघोषणापत्र
- जिल्हा प्रशासनाने मागितलेली इतर कागदपत्रे
अर्ज प्रक्रिया
- लाभार्थ्याने आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावीत.
- जिल्हा समाजकल्याण कार्यालय / प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत नोंदणी करावी.
- तपासणी व प्रमाणीकरणानंतर DBT द्वारे थेट बँक खात्यात रक्कम जमा होईल.
- लाभार्थ्याने साधन खरेदी करून ३० दिवसांच्या आत बिल/इन्व्हॉइस सादर करणे आवश्यक आहे.
मुख्यमंत्री वयोश्री योजना अंमलबजावणी
- समाजकल्याण विभाग या योजनेची देखरेख करतो.
- जिल्हा प्रशासन, आयुक्तालय, आरोग्य विभाग यांचा सहभाग असतो.
- लाभार्थ्यांची तपासणी, प्रवास, अल्पोपहार, प्रमाणपत्र वाटप यासाठी स्वतंत्र निधी दिला जातो.
योजनेचे फायदे
- जेष्ठ नागरिकांना दैनंदिन जीवनात स्वावलंबन.
- मानसिक आरोग्य सुधारणा व आत्मविश्वास वाढ.
- सामाजिक सुरक्षा व शासनाचा आधार.
- ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना समान लाभ.
निष्कर्ष
“मुख्यमंत्री वयोश्री योजना” ही जेष्ठ नागरिकांसाठी खूप उपयुक्त आहे. वयोमानानुसार येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी शासनाने दिलेला हा आधार त्यांच्या जीवनात नवा आत्मविश्वास निर्माण करतो. प्रत्येक पात्र नागरिकाने वेळेत अर्ज करून या योजनेचा लाभ घ्यावा.
वयोवृद्धांसाठी योजना–
श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना 2026 – संपूर्ण माहिती







Leave a Reply